ताज्याघडामोडी

शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिले पत्र; “प्रामाणिकपणे कर्ज…”

राज्यातील जवळपास २३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय महाविकास आघाडी निर्णय घेतला होता. सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय कायम ठेवला होता. 

नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याची मागणी काही लोकप्रतिनिधींनी केली होती. तसेच शेतकऱ्यांनी देखील ही मागणी केली होती. त्यानुसार, जे शेतकरी नियमित कर्ज फेड करतात त्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते.

जाचक अटी रद्द करून राज्यातील प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. मात्र अद्याप अनुदान न मिळाल्यामुळे एका शेतकऱ्याने चक्क स्वतःच्या रक्ताने आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले आहे.

प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ 50 हजार रुपयांचे अनुदान द्यावे या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्याना आपल्या रक्ताने पत्र लिहिलं आहे. शिरोळ तालुक्यातील विश्वास बालीघाटे असं या शेतकऱ्याचे नाव आहे.

सरकारने आश्वासन दिलंय पण त्याची पूर्तता कधी करणार असा सवाल देखील या शेतकऱ्याने उपस्थित केला आहे. जर सरकारने तात्काळ अनुदानाचे 50 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले नाहीत तर बेमुदत प्राणांतिक उपोषण करणार असल्याचा इशारा देखील या पत्रातून देण्यात आला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago