शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांसोबत मिळून महाविकास आघाडीचे सरकार पाडल्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असे सर्वांना वाटले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी अचानक शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री घोषीत केले.
त्यानंतर भाजपने अनेकदा मनाचा मोठेपणा दाखवला वगैरे अशा बतावण्या केल्या मात्र अखेर आज भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपचे सत्य बाहेर आले. भाजप नेत्यांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवले आहे. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भाजपची राज्य कार्यकारिणीच्या बैठक पनवेल येथे सुरू आहे. या बैठकीत संबोधित करताना चंद्रकांत पाटील म्हणाले,’केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या आदेशानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत. आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. खासकरून देवेंद्रजींनी त्यांच्या मनावर दगड ठेवला होता. हे दु:ख पचवून आपण पुढे गेलो, कारण आपल्याला पुढे जायचं होतं’, असे एकनाथ शिंदे म्हणाले. याच व्हिडीओमध्येच चंद्रकात शिंदे म्हणताना दिसतात की मुंबई आपल्याला जिंकायची आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटणार आहे. त्यामुळे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली असून तो व्हिडीओ सगळीकडून डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत.
बाबासाहेब पुरंदरे यांचं लिखाणातून माझ्यामते शिवछञपती यांच्यावर इतका अन्याय कोणी केला नाही. शिवचरित्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या बाबासाहेबांच्या लिखाणातून छत्रपती शिवजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय झाला, अशी सडेतोड मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं. तसेच शिवाजी महाराज यांच्या जडणघडणीमध्ये रामदास आणि दादोजी कोंडदेव यांच योगदान काय, असा सवालही पवारांनी यावेळेस उपस्थित केला. प्रा. श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथाचं प्रकाशन पवार यांच्या हस्ते पुण्यात झालं. यावेळेस ते बोलत होते.
पवार काय म्हणाले?
रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी शोधली. त्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख छ्त्रपती असा न करता ‘कुळवाडी भूषण’ असा केला. पण बाबासाहेब पुरंदरे यांनी खोटा इतिहास पसरवला. माझ्यामते शिवाजी महाराजांवर इतका अन्याय कोणी केला नाही. शिवचरित्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या बाबासाहेबांच्या लिखाणातून छत्रपती शिवजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय झाला”, असंही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांनी नमूद केलं.
रामदास आणि दादोजी कोंडदेव यांचे योगदान काय?
“अन्य घटकांचं महत्व वाढवण्याचे काम त्यांनी केलं. पण रामदासांचे योगदान काय, दादोजी कोंडदेवांचे योगदान काय? शिवाजी महाराजांना ज्यांनी दिशा दिल्या त्या फक्त जिजाऊ होत्या. सत्य गोष्टी अनेकांना न पटणाऱ्या आहेत. त्यांच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही”, असंही पवारांनी स्पष्ट केलं.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…