तक्रारदाराला फसवणूक प्रकरणातील पैसे परत मिळवून देण्यासाठी 50 हजारांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारताना हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
उपनिरीक्षकावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
सागर दिलीप पोमण (वय – 34) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कोरेगाव पार्क परिसरात ही कारवाई केली. याबाबत 32 वर्षीय तक्रारदाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. त्यांची अर्थिक फसवणूक झाल्याबाबत त्यांनी अर्जाव्दारे हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या प्रकरणात तक्रारदार यांना अर्थिक फसवणुकीतील रक्कम परत मिळवून देण्यासाठी उपनिरीक्षक पोमण यांनी 50 हजारांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
यानुसार पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता उपनिरीक्षक पोमण यांनी तक्रारदाराला पैसे परत मिळवून देण्यासाठी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच, लाचेची रक्कम कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेलमध्ये स्वीकारताना पोमण यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत.
माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या विशेष प्रयत्नांतून १५ कोटींच्या सिव्हेज पंपिंग स्टेशनचे काम प्रगतीपथावर पंढरपूर:…
नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांच्या मागणीला यश पंढरपूर : उजणी जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेले…
11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत पंढरपूर तालुक्यात दहा ठिकाणी होणार शिबिर कर्मयोगी श्रद्धेय स्व.…
पंढरपूर | प्रतिनिधी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…
पंढरपूर : पंढरपूर शहरातील नवी पेठ भाजी मंडई परिसरात आज पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ.…