ताज्याघडामोडी

पेट्रोलसाठी तीनशे रुपये दिले नाही म्हणून आला राग; मित्राचा चाकू भोसकून खून

पेट्रोलसाठी तीनशे रुपये न देणाऱ्या रूममेट मित्राचा चाकू पोटात भोसकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार वडगावशेरी परिसरात घडला. खून करून मित्र पसार झाले असून, एकाला अटक केली आहे.

मोहम्मद गुलशाद यामीन अन्सारी (वय २०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोहम्मद सरताज यामिन अन्सारी (वय २१) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी सोहेल इकरार अन्सारी (वय २२) याला अटक केली आहे. तर, मोहम्मद अन्सारी फरार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व तक्रारदार हे उत्तरप्रदेशातील आहेत. तक्रारदार व त्याचा भाऊ मोहम्मद हे गेल्या तीन वर्षांपासून पुण्यात असून, ते पाणीपुरी विक्रीचा व्यावसाय करतात. तर, मोहम्मद हा तीन महिन्यांपूर्वी येथे आला आहे. ते एकाच रूममध्ये राहत होते. दरम्यान, मोहम्मद याला मोहम्मद अन्सारी याने पेट्रोल भरण्यासाठी तीनशे रुपयांची मागणी केली. परंतु, मोहम्मद याने पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग मोहम्मदला आला होता. त्याने रागाच्या भरात ‘मला पैसे का देत नाहीस, तुला बघतोच’ असे म्हणत हाताने मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याला सोडविण्यासाठी तक्रारदारमध्ये पडले.

यावेळी आरोपीने भाजी कापण्याचा चाकू आणून मोहम्मद याच्या पोटात भोसकून त्याचा खून केला. त्यानंतर मोहम्मद याला पळून जाण्यास सोहेल अन्सारी याने मदत केली. त्यावरून पोलिसांनी सोहेलला अटक केली. आरोपी पसार झाला असून, त्याचा शोध घेतला जात आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

2 days ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…

1 week ago

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…

3 weeks ago

पंढरपूर सिंहगडच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात संपन्न

पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

4 weeks ago

स्त्रीशिक्षणाच्या क्रांतीची मशाल : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात विनम्र अभिवादन

पंढरपूर | प्रतिनिधी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे मंगळवार, दि. १०…

1 month ago