मध्य प्रदेशमधील भोपाळ शहरामध्ये दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराचा भर रस्त्यामध्ये कोथळा काढला. पादचाऱ्यांनी आरोपीला पडकले असून त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
भोपाळ शहरातील अशोका नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी आलोक श्रीवास्तव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या हत्याकांडाची माहिती दिली. कैलाश नगरच्या सेमरा भागामध्ये सोमवारी रात्री एका व्यक्तीने पत्नी आणि तिच्या प्रियकाराची चाकूने भोसकून हत्या केली. मृत महिला आपल्या पतीला सोडून प्रियकरासोबत लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये रहात होती.
मृत महिला विदिशा जिल्ह्यातील रहिवासी होती. ती आपल्या पाच वर्षाच्या मुलीसोबत भोपाळला आली होती आणि लिव्ह ईनमधील पार्टनरसोबत सेमरा भागामध्ये रहात होती. विदिशामध्ये राहणाऱ्या तिच्या पतीला याबाबत माहिती मिळताच त्याने भोपाळमध्ये येत दोघांची रेकी सुरू केली. तीन दिवस तो दोघांवर पाळत ठेऊन होता. सोमवारी रात्री संधी मिळताच त्याने दोघांचा काटा काढला
ही घटना घडली तेव्हा मृत महिलेची पाच वर्षांची मुलगीही त्यांच्यासोबत होती. आरोपीने महिलेवर चाकूने वार केल्यावर मुलगी खाली पडली आणि रडू लागली. या मुलीला आरोपीने काही केले नाही, मात्र तिच्यासमोरच आईवर चाकूने सपासप वार केले. तत्पूर्वी त्याने पत्नीसोबत लिव्ह ईनमध्ये राहणाऱ्या प्रियकराच्या गळ्यावर आणि पोटावर चाकूने वार करत त्याला ठार मारले.
दरम्यान, भररस्त्यात झालेल्या या हत्याकांडामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. आरोपीने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकांनी त्याला पकडून पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपीला अटक केली. पोलीस चौकशीमध्ये आरोपीने पत्नी आणि तिच्या प्रियकराची याआधीही समजूत काढल्याचे म्हटले. एक महिन्यांपूर्वी ती मला सोडून प्रियकरासोबत रहायला गेली. या रागातूनच आपण रस्त्याच्या कडेला लोखंडापासून हत्यारे बनवणाऱ्याकडून चाकू खरेदी केली आणि त्यांची हत्या केल्याची कबुली दिली.
पंढरपूर Gbs साथ रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील प्रशासन सज्ज आहे, पंढरपूर नगरपालिका…
सोलापूर दि.14 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात…
जिल्हा परिषद प्राथामिक शाळा सुर्ली (पुनर्वसन) केंद्र तुंगत ता. पंढरपूर येथे उपशिक्षक या पदावर कार्यरत…
प्रतिनिधी कुशल नेतृत्वाखाली दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने ऐतिहासिक गुंतवणूक…
बर्ड फ्लू बाबत सतर्कतेचे आवाहन सोलापूर दि.31 (जिमाका):- जिल्ह्यातील सर्व शासकीय खाजगी व परीसरातील कुक्कुट…
प्रतिनिधी-जिल्हा नियोजन भवन, सोलापूर येथे राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुमार गोरे…