प्रेषित मुहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा न्यायालयात धाव घेत आहेत. दरम्यान, राजस्थानमध्ये त्याच्याशी संबंधित एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राजस्थानच्या श्री गंगानगर जिल्ह्यात असलेल्या हिंदू मलकोट सीमेवर बीएसएफने पाकिस्तानी घुसखोराला यापूर्वी अटक केल्याची माहिती मिळाली आहे. त्याला कटाच्या अंतर्गत भारतात पाठवण्यात आले आहे. बीएसएफच्या चौकशीत याबाबत धक्कादायक खुलासे झाले आहेत.
नुपूर शर्माला मारण्यासाठी पोहोचला भारतात
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, आरोपी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची हत्या करण्याचा प्रयत्न करणार होता. त्याच्यावळ अनेक संशयास्पद वस्तू आढळून आल्या आहेत. गुप्तचर संस्था इंटेलिजन्स ब्युरो (IB), रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) आणि लष्करी एजन्सीची संयुक्त टीम त्याची चौकशी करत आहे.
तरुणाकडे सापडला 11 इंची धारदार चाकू
सूत्रांनी सांगितले की, संशयित 16 जुलै रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास श्रीगंगानगर जिल्ह्याला लागून असलेल्या हिंदुमलकोट सीमेवर संशयास्पदरित्या फिरत होता. गस्ती पथकाला संशय आल्याने त्याची चौकशी केली. त्याला नीट उत्तर देता आले नाही. झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 11 इंची धारदार चाकू, धार्मिक पुस्तके, नकाशे, कपडे आणि खाद्यपदार्थ सापडले.
प्रतिनिधी-जिल्हा नियोजन भवन, सोलापूर येथे राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुमार गोरे…
प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज…
सोलापूर, दिनांक 2(जिमाका):- जिल्ह्याच्या नागरी व ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा…
सोलापूर दि.1 जानेवारी 2025 (जिमाका) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत मांग, मातंग,…
पंढरपुर येथे 'केंद्रीय कृषी उडान योजना २.०' अंतर्गत विमानतळ व्हावे या मागणीसाठी आमदार अभिजित पाटील…
महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसोबत वाद झाल्यानंतर हॉस्टेलमधून पळून गेलेल्या एका…