सासऱ्याच्या घरातच घरफोडी करुन चोरी करण्याचा प्रकार जावायाने केला आहे. पुण्यात हडपसरमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी त्या जावायाला बेड्या ठोकल्या आहेत. 10जुलै 2022 ला विश्वजीत अशोक कांबळे यांच्या घरामध्ये दुपारी घरफोडी झाली होती. कांबळे यांच्या घरची मंडळी दुपारी चित्रपट पाहायला गेल्यानंतर त्यांच्या घरी घरपोडी झाली होती.
घरात घरफोडी करताना कोणतीही तोडफोड झाली दिसली नाही. यामुळे ही घोरपडी कोणीतरी ओळखीच्याच व्यक्तीने केली असावी असा पोलिसांचा संशय होता. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरु केला. संशयावरून पोलिसांनी कांबळे यांच्या घरच्या व्यक्तींकडे विचारपूस केली. त्यादरम्यान विश्वजीत अशोक कांबळे यांचे जावई निखिल संभाजी पवार यांनी स्वतःच्या सासरच्या घरात डुप्लिकेट चावीच्या माध्यमातून घरफोडी केल्याचे निष्पन्न झाला आहे.
या प्रकरणात निखिल संभाजी पवार याला अटक करुन हडपसर पोलीसांनी साडेतीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. हडपसर भागातील शिवाजी जनार्धनराव पाटील या वकिलांचे दागिने चोरणाऱ्या जमील आयुब शेख या आरोपीला देखील हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. जमील अयुब शेख यांच्याकडून साडेसहा लाख रुपये किमतीचे 13 तोळे सोन्याचे दागिने हडपसर पोलिसांनी जप्त केले आहेत.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…