ताज्याघडामोडी

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशाच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ

दि.२१ जुलै २०२२ पर्यंत मुदत

पंढरपूरः- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.) क्र.- ६४३७ ला मान्यता मिळाली असून या प्रक्रियेला आता पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे. गुरुवार, दि.०२ जून २०२२ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आदी प्रक्रिया सुरू झाली होती आणि दि.३० जून २०२२ ला संपणार होती पण दरम्यानच्या कालावधीत अनेक विद्यार्थांना प्रशासनाकडून कागदपत्रे व प्रमाणपत्रे उपलब्ध झाली नाहीत. ही बाब लक्षात आल्यामुळे आता या प्रक्रियेला दि.१४ जुलै पर्यंत मुदतवाढ मिळाली होती परंतु सीबीएसई च्या विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल अद्याप घोषित झाला नसल्याने अशा विद्यार्थ्यांची रजिस्ट्रेशन  प्रक्रिया अजून झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा मुदतवाढ केली असून विद्यार्थ्यांना आता दि. २१ जुलै पर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे. दहावीच्या निकालापूर्वीच यावर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांनी दिली.

         डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी शै.वर्ष २०२२-२३ मध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, भरलेले अर्ज स्विकारुन प्रमाणपत्रे, कागदपत्रांची तपासणी, छाननी आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा. संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांनी अधिकृत केंद्र (एफ.सी. क्र.-६४३७) म्हणून स्वेरीच्या डिप्लोमा महाविद्यालयास मान्यता दिली आहे. ‘पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन, पालकांचा होणारा संभ्रम, संबंधीत कागदपत्रे जमविताना होणाऱ्या अडचणी व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु केले असून यंदाचे स्वेरी डिप्लोमा इंजिनिअरिंगचे १५ वे वर्ष आहे. स्वेरीच्या डिप्लोमा महाविद्यालयाने  उज्ज्वल यशाची परंपरा  कायम राखली आहे. ही  प्रकिया दि.०२ जून २०२२ पासून ते दि.२१ जुलै २०२२ रोजी सायं. ५ वाजेपर्यंत चालणार आहे. याचा लाभ दहावी मधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, ज्यांनी अजून रजिस्ट्रेशन केले नाही असे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी घ्यावा’ असे आवाहन केले आहे. दरम्यान या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर मुख्य कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे. डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रा.एस.एस.गायकवाड (मोबा.क्र.-९८९०५६६२८१) व प्रा.एम.एम.मोरे (मोबा.क्र.-९४२१९६०२५८) यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली उच्चशिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने सर्वोत्कृष्ट निकाल, आदर युक्त शिस्त आणि करिअरच्या दृष्टीने सर्वोत्तम संस्कार देण्याची परंपरा कायम राखल्यामुळे स्वेरीच्या ‘पंढरपूर पॅटर्न’ चा दबदबा कायम आहे. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे ५ अभ्यासक्रमांना मिळालेले एनबीए मानांकन, महाराष्ट्र व गोवा राज्यातील बेस्ट पॉलिटेक्निक कॅम्पस अवॉर्ड, गेली सलग पाच वर्षे शंभर टक्के ऍडमिशन होणारे महाराष्ट्रातील एकमेव खाजगी महाविद्यालय आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या पसंतीस उतरलेले ‘स्वेरी अभियांत्रिकी’ हे राज्यात ‘ब्रँड’ बनले आहे. त्यामुळे स्वेरीत प्रवेशासाठी प्रचंड गर्दी होत आहे. या वर्षीही विद्यार्थी व पालक यांचेकडून स्वेरी डिप्लोमालाच प्रथम पसंती व उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. सन २०२२-२३ करीता प्रवेशासाठी स्वेरी संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग फॅसिलिटेशन सेंटरमध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात सहा दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम उत्साहात संपन्न

५० हून अधिक प्राध्यापकांचा सहभाग आणि ५० हून अधिक उत्पादनांची निर्मिती कोर्टी, पंढरपूर | दि.…

11 hours ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 week ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago