ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडचे डाॅ. बाळासाहेब गंधारे यांना विद्यापीठाकडून संशोधन निधी प्राप्त

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात कार्यरत असलेले डाॅ. बाळासाहेब गंधारे यांना सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाकडून ८५ हजार रुपये संशोधन निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

सिंहगड महाविद्यालयाकडून मागील वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामधून संशोधनास अर्थसाहाय्य देण्यासाठी सीड मनी या योजनेंतर्गत प्रस्ताव मागविण्यात आले होते. यामध्ये एस. के. एन. सिंहगड अभियांञिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील प्राध्यापक डाॅ. बाळासाहेब गंधारे यांनी प्रस्ताव दाखल केला होता. सदर प्रस्तावाची विद्यापीठ स्तरावर व बाहेरील स्तरावरून निवड करण्यात आली आहे डाॅ. बाळासाहेब गंधारे यांच्या प्रस्तावास ८५ हजार रूपये संशोधन निधी मिळणार आहे.

यामुळे महाविद्यालयातील संशोधनास मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. डाॅ. बाळासाहेब गंधारे यांनी मेकॅनिकल क्षेञाशी निगडित असलेल्या “सोलर पॉवर प्लांटच्या देखभाल धोरणाचे मूल्यांकन” या विषयावर प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास विद्यापीठाने मान्यता दिली असुन ८५ हजार रूपये अनुदान मिळणार आहे.

प्रत्येक वर्षी महाविद्यालयाला संशोधनासाठी निधी प्राप्त होत असल्याने महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण होत आहे. भविष्यात जास्तीत-जास्त संशोधन निधी उपलब्ध होण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग प्रयत्न करीत आहेत.

या संशोधन निधीचा फायदा पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील प्राध्यापक व महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी खुप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाकडून निधी प्राप्त केल्याबद्दल संशोधनास यांचे महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी सह सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago