कानपूरमध्ये एक शिक्षक दारुच्या नशेत शाळेत पोहोचला होता. त्याने दारुच्या नशेत विद्यार्थ्यींनींसमोर वर्गातल्या कचरा डब्ब्यात लघवी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याला रोखायला गेलेल्या एका शिक्षकाला त्याने शिवीगाळ करत मारहाण केली. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यीनींनी त्या शिक्षकाला मारहाण केली आहे.
कानपूरच्या सजेती गावातील प्राथमिक शाळेत शिक्षक रणविजय सिंह दारुच्या नशेत तर्राट अवस्थेत शाळेत पोहोचला. त्यानंतर तो शाळेच्या आवारात अर्वाच्च्य भाषेत बोलत होता व शिवीगाळ करत होता. त्याला इतर शिक्षकांनी व मुख्यध्यापकांनी समजवायचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकत नव्हता. वर्गातीलच एका कचऱ्याच्या डब्ब्यात तो लघवी करू लागला. तेव्हा एका शिक्षकांने त्याचा व्हिडीओ काढला. ते पाहून तो भडकला व त्याने त्या शिक्षकाला मारायला सुरुवात केली.
ते पाहून शाळेतील विद्यार्थीनी भडकल्या व त्यांनी रणविजयला मारहाण केली. त्यानंतर सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून त्या शिक्षकाला एका वर्गात बंद करून ठेवले. मुख्यध्यापकांनी पोलिसांना बोलावून घेतले व त्या शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. रणविजय याला तत्काळ शाळेतून निलंबीत करण्यात आले आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…
पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…
सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…
पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…