ताज्याघडामोडी

सख्खा भाऊ बनला पक्का वैरी, अंगणात थुंकल्याने केला मोठ्या भावाचा खून

क्रोध आल्याने माणसाच्या हातून काहीही होऊ शकते. रागाच्या भरात अनेकदा माणून आपली सद्बुद्धी गमावतो आणि मग होत्याचं नव्हतं घडतं. अशीच एक भयंकर घटना नांदेडमध्ये घडली आहे.

नांदेड शहरातील शिवराय नगर येथील धक्कादायक बाब म्हणजे रक्ताच्या नात्यानेच एका तरुणाचं आयुष्य संपवलं आहे. नांदेडमध्ये अंगणात थुंकल्याच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाची निर्घुण हत्या केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. शुल्लक कारणावरुन रक्तातील नातं असलेल्या सख्या लहान भाऊ एकनाथने सख्या भाऊ सतीष मोठ्या भावाचाच काटा काढला आहे.

आजपर्यंत आपण मालमत्ता, पैश्याचा वाद, शेतीचा वाद, वाटणी आणि अनैतिक संबंध अश्या अनेक कारणांनी भावाने भावाचाच काटा काढल्याचे उदाहरण आहेत. मात्र, नांदेडमधील शिवराय नगर येथील लहान भावाने मोठ्या भावाचा खून करण्याचे कारण ऐकुण कुणालाही आश्चर्य वाटेल. केवळ अंगणात थुंकण्याच्या कारणावरून लहान भावाने मोठ्या भावाचा खून केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान भाऊ असलेला एकनाथ तुपसमूद्रे आणि मोठा भाऊ सतीष तुपसमूद्रे यांच्यात आंगनात का थूंकल्यावरुन वाद झाला आणि रागाच्या भरात एकनाथने घरातून भाजी चिरण्याचा चाकू घेऊन सतीषच्या छातीत रागाच्या भरात सपासप वार केले.

काही कळण्याच्या आत सतीष रक्ताच्या थारोळ्यात पडला शेजारच्या लोकांनी सतिषला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले असता सतीष रुग्णालयाच्या बाहेर मयत झाला. आरडाओरड ऐकूण आजूबाजूचे लोकं धावले मात्र एकनाथने घटनास्थळावरुन पलायन केले.सतीश आणि एकनाथ हे दोघे सख्खे भाऊ एकाच ठिकाणी राहतात. मात्र,अंगणात थुंकल्याच्या शुल्लक कारणाने सतीषला स्वतःचा जीव गमवावा लागला, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली, मात्र तोपर्यंत मारेकरी एकनाथ फरार झाला. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात एकनाथ तुपसमूद्रे याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.फरार आरोपी एकनाथला पोलिसांनी काही तासातच ताब्यात घेतले, भाग्यनगर पोलिसांनी आरोपी एकनाथला कोर्टात हजर केले असता कोर्टाने दोन दिवसाची पोलीस कोठड़ी सुनावली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

7 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago