शिवसेनेच्या 40 हून अधिक आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करून भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले. तब्बल 40 आमदार गेल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला.
त्यातच शिवसेनेचे खासदार देखील एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे वृत्त आले होते. त्यातच सोमवारी मातोश्रीवर सुरू झालेल्या बैठकीला तब्बल 10 खासदारांनी दांडी मारली आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
मागील अनेक दिवसांपासून शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ खासदार देखील एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत अशा चर्चा सुरू आहे. त्यातच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याकडे शिवसेनेच्या खासदारांचा कल आहे. या पार्श्वभूमीवर मातोश्रीवरील बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मात्र या बैठकीला लोकसभेच्या 10 खासदारांनी दांडी मारल्याचं समोर आलं आहे.
लोकसभचे उपस्थित खासदार
गजानन कीर्तिकर, मुंबई नॉर्थ वेस्ट
अरविंद सावंत, मुंबई दक्षिण
विनायक राउत, रत्नागिरी- सिंधुदुर्ग
धैर्यशील माने, हातकणंगले
हेमंत गोडसे, नाशिक
राहुल शेवाले, दक्षिण मध्य मुंबई
श्रीरंग बारणे, पिंपरी चिंचवड
प्रताप जाधव, बुलढाणा
सदशिव लोखंडे, शिर्डी
राज्यसभा खासदार
संजय राउत, राज्यसभा
प्रियंका चतुर्वेदी, राज्यसभा
गैरहजर खासदार
यवतमाळ-वाशिम – भावना गवळी
पालघर – राजेंद्र गावित
परभणी – हेमंत जाधव
कोल्हापूर – संजय मांडलिक
हिंगोली – हेमंत पाटील
उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर
कल्याण-डोंबिवली – श्रीकांत शिंदे
रामटेक – कृपाल तुमाने
ठाणे – राजन विचारे
दादरा-नगर हवेली – कलाबेन डेलकर
५० हून अधिक प्राध्यापकांचा सहभाग आणि ५० हून अधिक उत्पादनांची निर्मिती कोर्टी, पंढरपूर | दि.…
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…