देशभरात मॉन्सून आता सक्रीय झाला आहे. आता काही राज्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. हा पाऊस शेतीसाठी फायदेशीर आहे. भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेशसह काही राज्यात आगामी 24 अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
बिहार, ओदिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू कश्मीरमध्येह हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.
मुंबईमध्ये पावसाने थोडी उसंत घेतली आहे. मात्र, आगामी 24 तासात मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने याबाबत अलर्ट जारी केला आहे.
तसेच या काळात हायटाईड येण्याची शक्यता असल्याने चौपाटी किंवा समुद्रकिनारी जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत शनिवारी हाय टाईड येण्याची शक्यता असल्याने समुद्रकिनारी आणि चौपाट्यांवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या काळात 3.6 मीटरच्या म्हणजे सुमारे 11 फूटांच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राजधानी दिल्लीत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीत तापमानात घट होत ते 38 अंशसेल्सिअसपर्यंत आले आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा, सिवनी, बालाघाट, मंडला, बुरहानपूर, खंडवा या भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…