पंढरपूर नगर परिषदेचे आरोग्य विभागाकडील मुकादम श्री उत्तम शंकर ढवळे हे आषाढी यात्रा कालावधीमध्ये लोकमान्य विद्यालय येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या हजेरी घेत असताना तीन व्यक्ती दारू पिलेल्या अवस्थेत त्या ठिकाणी आल्या महिला सफाई कर्मचारी असताना त्या ठिकाणी एका बाजूला लघवी करण्यासाठी उभारले यावेळी महिला सफाई कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असल्याने मुकादम यांनी त्यांना हटकले असता त्यांनी श्री उत्तम शंकर ढवळे यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली याबाबत पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित व्यक्तींना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
जर या व्यक्तींना अटक करून कायदेशीर कारवाई केली नाही तर पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी संघटना चे वतीने काम बंद आंदोलन करणेत येईल असा इशारा दिला त्यावेळी पोलीस कर्मचारी बांधवांनी अतिशय सौजन्यपूर्वक सहकार्य करत संघटनेचे म्हणणे ऐकून घेऊन निश्चितपणाने कारवाई करण्याचा आश्वासन यावेळी दिले यावेळी पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, जनरल सेक्रेटरी अँड. सुनील वाळुजकर, आरोग्य निरीक्षक व कामगार संघटनेचे सहकार्याध्यक्ष नागनाथ तोडकर ,उपाध्यक्ष संतोष सर्वगोड, अँड.किशोर खिलारे, धनंजय वाघमारे, महावीरभाऊ कांबळे, दिनेश साठे, किशोर दंदाडे, अखिल भारतीय मजदूर सफाई काँग्रेस चे अध्यक्ष गुरू दोडिया,महेश गोयल व मोठ्या प्रमाणात सफाई कर्मचारी उपस्थित होते.
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…