ताज्याघडामोडी

स्वतःला श्रद्धांजली वाहत प्रेमभंग झालेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रेमभंग झाला म्हणून एका प्रेमवीराने आधी मोबाईलवर प्रेमभंगाचा व्हिडिओ असणारा रील स्टेटसला ठेवलं, मग पुन्हा स्वतः च्या फोटोला श्रद्धांजली वाहून थेट गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाळवा या ठिकाणी एका शेतातल्या गोठ्यामध्ये सुशांत तोडके याने ही आत्महत्या केली आहे.

घटनेबाबत आष्टा पोलिसांकडून मिळालेली माहितीप्रमाणे, वाळवा येथील खेड रोडवर एका शेतामध्ये असणाऱ्या गोठ्यात सुशांत भरत तोडके ( वय – 26 ) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुशांत तोडके हा गावातल्या एका शेतामध्ये शेतमजुरीचे काम करतो. तो मूळचा पलूस तालुक्यातील नागठाणे येथील असून, कामानिमित्त वाळवा या ठिकाणी भाड्याच्या खोलीमध्ये राहत होता.

सोमवारी सकाळच्या सुमारास सुशांत याने आपल्या मोबाईल मधील व्हॉट्सअॅप स्टेटसला एक प्रेमभंग असणारा व्हिडिओ रील ठेवला. त्यानंतर सुमारे अर्धा तासानंतर सुशांत याने आपल्याच फोटोला श्रद्धांजली वाहणारा फोटो बनवला आणि तो आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवला. थेट गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. काही वेळानंतर सुशांत याच्या नातेवाईकांनी सुशांत याचा व्हॉट्सअॅपवरचा स्टेटस पाहिला आणि सगळ्यांची एकच धावपळ सुरू झाली.

कुटुंबाने मग तो राहत असलेल्या घराच्या मालकाला संपर्क करून, सुशांतचा शोध घेण्यास सांगितले. त्यानंतर सुशांत याचे घरमालक ईशान गावडे हे सुशांतच्या शोधासाठी, तो काम करत असलेल्या शेतामध्ये पोहोचले होते. यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या गोठ्यामध्ये गेले असता, त्यांना सुशांतचा मृतदेह लटकत असल्याचा आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस पोहचून पंचनामा करण्यात आला, असून या घटनेची नोंद झाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती आष्टा पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

20 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago