ताज्याघडामोडी

हिम्मत असेल तर मध्यावधी निवडणुका लावा, मग पाहू, उद्धव ठाकरेंचं सरकारला ओपन चॅलेंज

आज एकनाथ शिंदे सरकार बहुमत चाचणीला सामोरे जात होते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याच शिंदे गटावर शिवसेना भवनात आसूड ओढत होते. “लढायचे असेल तर सोबत राहा. भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे. असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ. त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी मध्यावधी लावावी, मग पाहू, असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं.

उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात शिवसेना जिल्हाध्यक्षांच्या बैठकीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच भाजपच्या इराद्यावरही शरसंधान साधलं. “गेल्या अनेक वर्षांपासूनचा शिवसेना संपविण्याचा भाजपचा डाव आहे. पण ही शिवसेना कधीच संपणार नाही. मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी नेहमी लढत राहिन. ज्यांना लढायचं असेल त्यांनी सोबत राहा. आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“भाजपचं राजकारण म्हणजे शिवसेनेला संपविण्याचा डाव आहे. जर त्यांच्यात हिम्मत असेल तर मध्यावधी निवडणुका घ्याव्यात, मग आपण पाहू. हा सगळा खेळ खेळण्याऐवजी आपण जनतेच्या दरबारात जाऊ. आपची चूक असेल तर जनता सांगेल. त्यांची चूक असेल तर जनता त्यांना घरी पाठवेल. भाजपच्या राजकारणा आपण सडेतोड प्रत्युत्तर देऊ” असा इरादा उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला.

विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा संविधानाचा अवमान आहे. राज्यात जे काही घडतंय, ते खरंच बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला धरुन आहे का? यावर घटनातज्ज्ञांनी जरुर बोलावं, आपली मतं मांडावीत, लोकशाहीचा वाचली पाहिजे, असा हा लढा आहे. त्यामुळे घटनातज्ज्ञांनी जरुर भूमिका घ्यावी, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago