पंढरपूर – शनिवार, दि.०२.०७.२०२२ रोजी श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशाला येथे विद्यार्थ्यांनी नाटकाव्दारे शेतक-यांची व्यथा मांडत ‘कृषी दिन’ मोठ्या उस्ताहात साजरा करण्यात आला.
हरीतक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त “कृषी सप्ताह साजरा” केला जातो याचे औचित्य साधून प्रशालेचे शिक्षक प्रा.सुनिल लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली “शेतक-यांची व्यथा” हे नाटक सादर केले.
यावेळी प्रशालेच्या प्राचार्या सौ.प्रियदर्शनी सरदेसाई मॅडम म्हणाल्या की, “शेतक-यांच्या मुलांनी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेवून प्रशासकीय सेवांमध्ये जावून शेतक-यांच्या व्यथा समजावून घेवून त्यांचे निराकरण करणे हे सध्या काळाची गरज आहे”.
संस्थेचे चिफ ट्रस्टी श्री रोहनजी परिचारक म्हणाले की, सर्व विद्यार्थ्यासोबत शेतक-यांच्या मुलांनी शिक्षण घेवून मोठे होवून आई-वडिलांचे ऋण फेडणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशालेचे प्रा.मंगेश भोसले यांनी, तर आभाप्रदर्शन प्रा.सुनील गोडसे यांनी केले.यावेळी संस्थेचे रजिस्ट्रार श्री गणेश वाळके, शेतकरी श्री सुभाष येडगे, श्री योगेश येडगे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…