कोर्टी (ता.पंढरपूर) येथील येथील एस.के.एन.सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एंजल इन्व्हेस्टमेंट / व्ही.सी फंडींग अपॉर्च्युनिटी फॉर अर्ली स्टेज इंटरप्रन्युअर याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल (आय आय.सी) व इंटरप्रन्युअर डेव्हलपमेंट सेल (ई.डी.सी) सेल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले होते हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या उद्योजक विकासासाठीएंजल इन्व्हेस्टमेंट / व्ही.सी फंडींग अपॉर्च्युनिटी फॉर अर्ली स्टेज इंटरप्रन्युअर याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या व्याख्यान सुरुवातीस महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी संदीप हेगडे यांचे स्वागत केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उप प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णीयांनी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना संदीप हेगडे म्हणाले नवीन उद्योजक व्यवसाय सुरू करताना व्हेंचर कॅपिटल व एंजल इन्व्हेस्टमेंट याबद्दल सखोल माहिती दिली नवीन उद्योजकांना भांडवल उभे कसे करायचे याबद्दल माहिती दिली व बरेच लोक इन्व्हेस्टमेंट साठी तयार असतात त्यांच्याकडून भांडवल कसे मिळवायचे त्याबद्दल इ माहिती दिली व पंढरपूर हे मोठी बाजारपेठ आहे त्याठिकाणी नवीन उद्योजकांना बरेच संधी आहे वाव आहे व नवीन उद्योजकांमध्ये जर पॅशन असेल तर तो उद्योजक यशस्वी होतोच अशी खूप महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली त्यांना साठी कम्प्युटर डिपार्टमेंट मेकॅनिकल डिपारमेंट इलेक्ट्रिकल डिपारमेंट या शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते
. हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. प्रदीप व्यवहारे, प्रा .गणेश बिराजदार, प्रा.विक्रम भाकरे,प्रा.मनोज कोळी आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. बाळासाहेब गंधारे यांनी केले तर सत्र तज्ञ याची माहिती प्रा. राहुल शिंदे यांनी दिली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…