ताज्याघडामोडी

कर्मयोगीच्या विद्यार्थिनीची टीसीएस मध्ये निवड

टाटा कन्सलटंसी सर्विसेस या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंजली कुनाळे या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली.

टाटा कन्सलटंसी सर्विसेस या कंपनीने घेतलेल्या अंतिम निवड फेरीतून कम्प्युटर सायन्स अँड इंजीनीरिंग विभागातील तिसर्‍या वर्षात शिकत असणार्‍या अंजली कुनाळे या विद्यार्थिंनीची निवड करण्यात आली असून त्यांना वार्षिक 7 लाखांचे पॅकेज मिळाले आहे. टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेस लिमिटेड ही माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात काम करणारी जगातील प्रख्यात भारतीय कंपनी आहे.
विशेष महत्वाची बाब म्हणजे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होण्या आधीच अंजली कुनाळे यांना नामवंत कंपनी मध्ये उत्तम पॅकेज मिळाले असल्याने विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या आणि महाविद्यालयाच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.

कर्मयोगी मध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणा बरोबर च कार्पोरेट क्षेत्रामध्ये आवश्यक असणार्‍या सर्व मूलभूत कौशल्यांचा सखोल अभ्यास करून प्रशिक्षीत केले जाते आणि त्याचाच परिणाम म्हणून आज शिक्षण पूर्ण होण्या आधीच विद्यार्थ्यांची विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड होताना दिसून येत आहे यामुळे विद्यार्थी व पालक वर्गामद्धे आनंदाचे वातावरण आहे॰

श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख प्रा. दीपक भोसले तसेच इतर सर्व विभागाचे विभागप्रमुख व प्राध्यापक यांनी अंजली कुनाळे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

12 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago