शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये घेण्यात आलेल्या १० वी एस.एस.सी. परीक्षेचा निकाल आज दिनांक १७.०६.२०२२ रोजी जाहीर झाला.
पंढरपूर तालुक्यातील कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेचा सालाबादप्रमाणे याहीवर्षी १०० % निकालाची परंपरा कायम राखत इ.१० वी चा निकाल १०० % लावून प्रशालेने उत्तुंग यश मिळविले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक आणि शिक्षक हेच पालक हि प्रणाली वापरल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास सहज आणि सोपे गेले.
तसेच इ.१० वीच्या विद्यार्थ्यांकडून नियमित अभ्यास करुन घेतल्यामुळे व कोरोना कालावधीतही विद्यार्थ्यांकडून सकाळी ९.०० ते दु.२.०० वाजेपर्यंत ऑनलाईन क्लासद्वारे सर्व अभ्यासक्रम पूर्ण करुन घेतला गेला. कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशाला ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी प्रयत्नशील असते.
सदरच्या इ. १०वी परीक्षेमध्ये अंजली दिंडोरे हिने ९१.८०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला तसेच समर्थ वेल्हाळ याने ८७.२०% मिळवत व्दितीय क्रमांक तर रिया स्वामी हिने ८६.६० % गुण मिळवून प्रशालेमध्ये तृतीय क्रमांक मिळवला या प्रशालेतील इ. १०वी परीक्षेस एकूण २१ विद्यार्थी बसले होते त्यापैकी १२ विद्यार्थ्यांनी ७५ टक्के व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करुन घवघवीत यश संपादन केले.सदर विद्यार्थ्यांना प्राध्यापक श्री साबळे, श्री जाधव, श्री याळगी, सौ.कोरबू, श्री त्रिंबक कुलकर्णी, श्री अरविंद कुलकर्णी, चौगुले सर, श्री डूणे या सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…