ट्रॅव्हल्स चालकाकडून वाशिम येथून पुण्यात आलेल्या एका महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी ट्रॅव्हल चालकाला स्वारगेट पोलिसांनी केली अटक केली आहे. नवनाथ शिवाजी भोग ( वय 38 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. पीडिता व तिच्या पतीचे विश्वास संपादन करुन बसमध्ये झोपण्यास सांगितले. पीडितेचा पती नैसर्गिक विधीसाठी खाली उतरल्यानंतर बस पळवून नेत महिलेवर भोग याने बलात्कार केला.
वाशीम येथून कामाच्या शोधासाठी पती पत्नी पुण्यात आले होते. त्यावेळी शनिवारी (दि. 11 जून) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास स्वारगेट एस.टी. स्टॅण्ड परिसरात झोपण्यासाठी जागा शोधत होते. तेवढ्यात खासगी बस चालक आरोपी नवनाथ शिवाजी भोग हा पीडित महिला व तिच्या पतीस तुम्ही माझ्या बसमध्ये झोपा, एवढ्या रात्री कुठे जागा मिळणार, असे त्यांनी सांगितले. त्यावर विश्वास ठेवून दोघे बसमध्ये आराम करण्यास गेले. तेवढ्यात पीडित महिलेचा पती नैसर्गिक विधीसाठी गेला असता, आरोपीने काही क्षणात पीडितेला बसमधून पळवून नेली.
आरडा ओरड केल्यास जीवे मारेल, अशी धमकी आरोपीने पीडितेला दिली. स्वारगेटजवळ असलेल्या फुटपाथच्या बाजूला बस थांबून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पुन्हा कात्रज बस स्टॉप जवळील कॅनॉल फुटपाथच्या बाजूला बस थांबून पुन्हा तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. त्यानंतर बसमधून पीडित महिलेस खाली उतरवले आणि आरोपी तेथून पसार झाला. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दिल्यास पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…