ताज्याघडामोडी

स्वेरी पॉलिटेक्निकमध्ये थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

पंढरपूरः- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.६४३७) ला मान्यता मिळाली असून शुक्रवार (दि.१० जून २०२२) पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणेकागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आदी प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया शुक्रवारदि. ८ जुलैपर्यंत चालणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज  भरण्यासाठी फक्त  बारावी किंवा आय.टी.आय. ची गुणपत्रिका असणे  आवश्यक आहे.

शैक्षणिक वर्ष  २०२२-२३ मध्ये थेट द्वितीय वर्ष  डिप्लोमा इंजिनिअरिंगला  प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणेभरलेले अर्ज स्विकारुन प्रमाणपत्रेकागदपत्रांची तपासणीछाननी व नोंदणी आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा. संचालकतंत्र शिक्षण संचालनालयमहाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांनी अधिकृत केंद्र (एफ.सी. क्र.-६४३७) म्हणून स्वेरी पॉलिटेक्निकला मान्यता दिली आहे. पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शनपालकांचा होणारा संभ्रमसंबंधीत कागदपत्रे जमविताना होणाऱ्या अडचण व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु केले असून यंदाचे स्वेरी डिप्लोमा इंजिनिअरिंगचे हे १५ वे वर्ष आहे.

स्वेरीच्या डिप्लोमा महाविद्यालयाने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. दि.१० जून २०२२ पासून सुरू झालेल्या आणि दि. ८ जुलै (सायं ५:००) पर्यंत चालणाऱ्या या प्रक्रियेचा  लाभ बारावी व आय.टी.आय. (दोन वर्ष) मधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी घ्यावा असे आवाहन देखील केले आहे. दरम्यान या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणीछाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर दि.११ जुलै २०२२ रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रा. ए.एच.कलुबर्मे (मोबा.क्र. ९५४५५५३८३९) व प्रा. पी. डी. कदम (मोबा.क्र ९९२१०३०६६९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली उच्च शिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने सर्वोत्कृष्ट निकालआदर युक्त शिस्त आणि करिअरच्या दृष्टीने सर्वोत्तम संस्कार देण्याची परंपरा कायम राखल्यामुळे स्वेरीच्या पंढरपूर पॅटर्न’ चा दबदबा कायम आहे. तसेच  ५ अभ्यासक्रमांना मिळालेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे एनबीए मानांकनमहाराष्ट्र व गोवा राज्यातील बेस्ट पॉलिटेक्निक कॅम्पस अवॉर्डगेली सलग पाच वर्ष शंभर टक्के ऍडमिशन होणारे महाराष्ट्रातील एकमेव खाजगी महाविद्यालय असा नावलौकिक असणारे हे महाविद्यालय आहे. सन २०२२-२३ करीता प्रवेशासाठी स्वेरी संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग फॅसिलिटेशन सेंटरमध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

3 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago