फॅबटेक टेक्निकल कॅम्पसच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्चमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन अकोला जिल्हयाचे उपजिल्हाधिकारी श्री. अभयसिंह मोहिते यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्यांचा सत्कार फॅबटेक टेक्निकल कॅम्पसचे कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे यांच्या हस्ते करण्यात आला.श्री. अभयसिंह मोहिते यांनी अभियांत्रिकी शिक्षण वालचंद कॉलेज ऑफ सांगली येथे पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली.ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. सध्या ते अकोला जिल्हयाचे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. फॅबटेक कॉलेजमधील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
या प्रसंगी बोलताना उपजिल्हाधिकारी श्री. अभयसिंह मोहिते यांनी आधुनिक काळात परीक्षांची आवश्यकता आणि महत्व विशद केले. तसेच स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करण्यासाठी नियोजन आणि संसाधनांच्या उपलब्धतेचे महत्व सांगितले. कॅम्पसचे कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे यांनी येत्या काळात महाविद्यालयातून हुशार, होतकरू,विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले.
हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन मा. श्री भाऊसाहेब रूपनर, मॅनेजिंग डायरेक्टर श्री अमित रूपनर, कार्यकारी संचालक श्री दिनेश रूपनर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर बी शेंडगे,पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.शरद पवार, अकॅडमिक डीन प्रा. टी एन जगताप, प्रा. डॉ. नरेंद्र नार्वे,डॉ. तानाजी धायगुडे स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक प्रा.एस एस धरणे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका पावसकर यांनी केले तर आभार प्रा.एस एस गाडे यांनी मानले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…