पैशाच्या व्यवहारातून सुरू झालेल्या वादातून चंद्रपूर जिल्ह्यात एक अत्यंत क्रूर घटना घडली आहे. एका तरूणाच्या पाठीवर भला मोठा दगड बांधून त्याला विहीरीत फेकण्यात आले. यात त्या तरूणाचा दुर्देवी मृत्यू झाला.
मोरवा गावात राहणाऱ्या प्रवीण घिवे या युवकासोबत गावातील काही युवकांनी पैशावरून वाद घातला. त्यानंतर सदर वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. युवकांनी मिळून प्रवीणला मारहाण केली. मात्र ते युवक इथवर थांबले नाही. त्यांनी प्रवीणच्या पाठीला दगड बांधत त्याला विहिरीत फेकून दिले. या घटनेत प्रविणचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पडोली पोलीस घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी मृतदेह विहिरीबाहेर काढत पंचनामा केला.
पडोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी तपासाची चक्रे फिरवली असता या हत्ये प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. मृतक प्रवीण यांच्याकडून मारेकरी युवकांनी काही पैसे उसने घेतले होते. ते पैसे परत मागायला गेलेल्या प्रवीणचा त्या मारेकऱ्यांनी काटा काढल्याचे बोलले जात आहे. इतर आरोपींचा या प्रकरणी शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…