जून २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यात १२वी चा निकाल लागणार अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. मात्र आता मिळलेल्या माहितीनुसार १२ वी चा निकाल उद्या म्हणजेच बुधवारी ८ जूनला लागणार आहे.
दरम्यान बऱ्याच अडचणींचा सामना करीत या परीक्षा झाल्या होत्या. महाराष्ट्रातील विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी पेपर चेकिंगवर बहिष्कार टाकला आणि बारावीचा रिझल्ट कसा लागणार आणि कधी लागणार असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला होता . बारावीचा रिझल्ट उशिराच लागणार असं सगळ्यांना वाटू लागले होते .
पण अखेर आज प्रतीक्षा संपलेली आहे. बारावीचा रिझल्ट सांगितलेल्या वेळेत जाहीर करण्यात आलेला आहे. हा रिझल्ट तुम्हाला महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर मिळू शकतो. उद्या 8 जून 2022 रोजी बारावीचा निकाल दुपारी एक वाजता लागणार आहे. तुमच्याकडे जर पुरेशी माहितेय असेल तर तुम्ही तुमच्यासहित इतरांचा देखील निकाल वेबसाईटवर पाहू शकता.
कुठे पाहाल निकाल ?
–उद्या दुपारी १ वाजता बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येईल.
–हा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर www.mahahsscboard.in बघायला मिळणार आहे.
–निकाल पाहण्यासाठी स्वतःचा परीक्षेचा सीट नंबर/ रोल नंबर, आईचं नाव माहिती असणं आवश्यक आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…