ताज्याघडामोडी

फेक इंस्टाग्राम अकाऊंटवर अश्लील फोटो अपलोड; मुलीची आत्महत्या

सोशल मीडियावर फेक अकाऊंट तयार करून महिलांची बदनामी करण्याच्या अनेक घटना घडत आहेत. अशीच एक घटना तेलंगाणात घडली आहे. डिस्प्ले पिक्चरसह बनावट इंस्टाग्राम अकाउंट बनवून अश्लील मेसेज आणि फोटो पोस्ट केल्याने एका मुलीने आत्महत्या केली. आदिलाबाद जिल्ह्यातील इचोडा भागातील नरसापूर गावात ही घटना घडली आहे.

नरसापूर येथील एका मुलीने (१५) नुकतीच दहावी पूर्ण केली. एका अनोळखी व्यक्तीने तिचे डिस्प्ले फोटो आणि नाव असलेले बनावट इंस्टाग्राम तयार केले. काही दिवसांपासून आरोपी तिच्या नावाने इंस्टाग्रामवर अश्लील फोटो आणि मेसेज पोस्ट करत होता. मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. यानंतर पोलिसांकडे मदत मागण्याचा विचार आईने केला. मात्र, असा अश्लील प्रकार सांगायचा कसा असा विचार त्या मुलीने केला.

दरम्यान, 29 मे रोजी त्या मुलीने कीटकनाशक पित आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळातच तिला उलट्या झाल्या. तिच्या कुटुंबीयांनी हे पाहिले आणि तिला आदिलाबाद RIMs रुग्णालयात नेले. त्यानंतर तिला चांगल्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवले. मात्र, 30 मे रोजी उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago