बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अवघ्या 16 महिन्यांच्या चिमुकलीवर अत्याचार करून गळा आवळून नराधम बापाने खून केला होता.
अखेरीस सहाच महिन्यात न्यायालयाने या नराधम बापासह आईला फाशीची शिक्षा सुनावली आहे. सोलापूर येथे सोळा महिन्याच्या चिमुकलीवर बापाने अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या निर्दय बापासह आई सोलापूर जिल्हा विशेष न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. वडील धोलाराम बिश्नोई यांने स्वतःच्या मुलीवर अत्याचार केले.
त्यानंतर ओढणीच्या साह्याने गळा आवळून ठार केले होते. या घटनेत आई पुनी कुमारी बिश्नोई हिने मदत केली होती. धोलाराम बिश्नोई व पुनी कुमारी बिश्नोई राजस्थानीतील राहणाऱ्या जोडप्यावर 4 जानेवारी 2022 रोजी आपल्या सोळा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून गळा आवळून खून केल्याप्रकरणी सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सोलापूर फास्टट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवण्यात आला होता.
यामध्ये 31 साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. बाळाच्या मृतदेहाची मेडिकल टेस्ट केली असता अनैसर्गिक अत्याचार करत गळा आवळून खून केल्याचा प्रकार समोर आला होता. या आधारेच न्यायालयाने निकाल दिला होता.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…