ताज्याघडामोडी

‘तुझं लग्न दुसरीकडे कसं होतं ते बघतेच मी’ प्रेयसीच्या धमकीला घाबरुन प्रियकराची आत्महत्या

वर्ध्यामध्ये प्रेयसीच्या धमकीला घाबरुन प्रियकराने आत्महत्या केली.ही खळबळजनक घटना वर्ध्यातील सावंगी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली. ‘तुझे लग्न दुसरीकडे कसे होते ते मी बघते, दोन लाख रुपये दे! न दिल्यास तुला व तुझ्या कुटुंबीयाला ठार मारेन आणि तुला पोलीस केस मध्ये फसवेन’ अशी धमकी प्रेयसीने आपल्या प्रियकराला दिली होती. प्रेयसीसोबत तिच्या सहकाऱ्यांनीही तरुणाला धमकावलं होतं. सततच्या धमक्या आणि जाचाला कंटाळून अखेर तरुणानं गळफास घेत आत्महत्या केली आहे. या आत्महत्येनं तरुणाच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवून घेतलाय. सावंगी पोलीस या आत्महत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

आत्महत्या करणारा तरुण कोण?

आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आशिष नरेश भोपळे असं असून तो विरुळ आकाजी इथं राहायला होता. मांडवा शिवारात असलेल्या नाल्यातील झाडाला गळफास घेत आशिषने आत्महत्या केलीय. आशिषने मृत्यूपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीतून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सुसाईड नोट हाती लागल्यानंतर आशिषची आई सुनंदा नरेश भोपळे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन सावंगी पोलिसांनी दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय.

प्रेयसीची धमकी..

मृतक आशिष भोपळे आणि आरोपी पारबता कुंभेकर (रा. कृष्णापूर ता. आर्वी) यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, पारबता ही सहकारी तिलक साटोणे याच्यासोबत मिळून आशिषला नेहमी त्रास द्यायची. ‘तुझे लग्न कसे होते मी बघते’, अशी धमकी देऊन आशिषकडून वारंवार दोन लाख रुपयांची मागणी केली जात होती. पैसे देण्यास नकार दिल्यास तुला आणि तुझ्या कुटुंबियांना जिवे मारुन, तुला पोलीस केसमध्ये फसवेन, अशी धमकी आशिषला देण्यात आली होती.

प्रेयसी आणि तिच्या मित्राच्या सततच्या तगाद्यामुळे हताश आणि निराश झालेल्या आशिष भोपळेनं जीव दिला. सावंगी पोलीस स्टेशन हद्दीतील मांडवा शिवारात एका नाल्यातील झाडाला गळफास घेत त्यानं आत्महत्या करुन जीवन संपविले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

3 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

3 weeks ago