ताज्याघडामोडी

2515 योजनेतून पंढरपूर तालुक्यातील गावांसाठी 1 कोटी 80 लाख रुपयाचा निधी उपलब्ध

आ.बबनदादा शिंदे यांनी दिली माहिती 

माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पंढरपूर तालुक्यातील विविध गावातील २५१५ योजनेतून करण्यात येणाऱ्या विकास कामासाठी 1 कोटी 80 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.बबनदादा शिंदे यांनी दिली आहे.   

माढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील प्रमुख गाव अंतर्गत रस्ते  काँक्रीटीकरण करणे, वाड्यावस्त्यांवरील रस्ते काँक्रीटीकरण,खडीकरण व मुरमीकरण करणे  तसेच पेव्हींग ब्लॉक बसविणे, भुयारी गटार  करणे, सामाजिक सभागृह, हायमास्ट दिवा बसविणे या सारखी अनेक  विकासकामांसाठी  शासनाकडे निधी मिळणेसाठी  मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी केलेली होती व त्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करत १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करवून घेतला आहे.     

यामध्ये पंढरपूर तालुक्यातील 1)  पांढरेवाडी – (1)  वामन वाट ते टाकळी रस्ता (2 लाख), (2) कॅनॉल पाटी-पांढरेवाडी ते जाधववाडी – फाळके मळा रस्ता करणे. (2 लाख),(3) घोडके वस्ती ते संभाजीनगर रस्ता करणे. (2 लाख), (4) घोडके वस्ती ते लक्ष्मी मंदिर रस्ता करणे. (2 लाख) , (5) चिखलकर मळा ते खारे वस्ती रस्ता करणे. (2 लाख) अशी एकुण रक्कम रु. 10 लाख, 2) नेमतवाडी – नेमतवाडी ते शेवते शीव रस्ता रक्कम रु.10 लाख, 3) देवडे – रक्कम रु.10 लाख, 4) इश्वर वठार – रक्कम रु.10 लाख, 5) बाभूळगांव – रक्कम रु.10 लाख, 6) मेंढापूर – रक्कम रु.10 लाख, 7)  बार्डी  – रक्कम रु.10 लाख, 8) कान्हापूरी – रक्कम रु.10 लाख, 9) चिंचणी – रक्कम रु.10 लाख, 10) पेहे – रक्कम रु.10 लाख, 11) शेवते – रक्कम रु.10 लाख, 12) भोसे – रक्कम रु.10 लाख, 13) गुरसाळे – रक्कम रु.10 लाख, 14) व्होळे – रक्कम रु.10 लाख, 15) आढीव – रक्कम रु.10 लाख, 16) उंबरे (पागे) – रक्कम रु.10 लाख, 17) जळोली – रक्कम रु.10 लाख, 18) वाडी-कुरोली – रक्कम रु.10 लाख रुपये याप्रमाणे कामाचा  सामावेश आहे.   

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

3 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

3 weeks ago