भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणं महागात पडलं आहे. या प्रकरणी पडळकर यांच्यावर कर्जत पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आमदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमीत्त झालेल्या कार्यक्रमात शरद पवार आणि पडळकर यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला होता. दरम्यान या कार्यक्रमात शरद पवार यांच्याविरोधात पडळकरांनी भाषण केलं होतं. त्या संदर्भात कर्जत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५०५ (२) अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यासंबंधीची तक्रार पोलिसांना देण्यात आली होती. एका समाजाला एका व्यक्तीच्या विरोधात भडकवल्याबद्दल ही तक्रार देण्यात आली आहे.
काल चौंडी गावात प्रवेश करण्यापासून पडळकर यांना पोलिसांनी रोखल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना शरद पवारांवर टीका केली होती. बहुजनांची पोरं आजा-नातवाच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी यांनी रोहित पवार आणि शरद पवार यांच्यावर केली होती.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…
पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…
सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…
पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…