ताज्याघडामोडी

एकनाथ खडसे यांना ईडीचा झटका; जप्त केलेली प्रॉपर्टी 10 दिवसात खाली करण्याची नोटीस

मुंबई – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीने झटका दिला आहे. ईडीने जप्त केलेली प्रॉपर्टी खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि इतर 4 जणांना जप्त केलेली प्रॉपर्टी खाली करण्याची नोटीस दिल्याची सूत्रांची माहिती आहे. एकनाथ खडसे आणि इतर 4 आरोपींच्या जवळपास 11 मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आल्या होत्या. त्या मालमत्ता संदर्भात ही नोटीस असल्याची माहिती मिळत आहे.

10 दिवसात मालमत्ता खाली करण्याची सूचना

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि इतर 4 जणांना जप्त केलेली प्रॉपर्टी खाली करण्याची नोटीस दिल्याची सूत्रांची माहिती आहे. नोटीस दिलेल्या 10 दिवसापर्यंत ही खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोणावळा, पुणे, जळगाव, नाशिक, मुंबई अश्या ठिकाणी या मालमत्ता होत्या. एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी आणि इतर आरोपींच्या नावावर या मालमत्ता होत्या.

काय आहे प्रकरण?

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी 28 एप्रिल 2016 रोजी भोसरी एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र.52/2 अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून 3.75 कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रितसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या सर्व व्यवहारात सुमारे 61 कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाले असून हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ईडीला संशय आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago