महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आहेत. शिवसेना ५५, राष्ट्रवादी काँग्रेस ५४, काँग्रेस ४४, इतर पक्ष ८ आणि अपक्ष ८ असे महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर, भाजपकडे ११३ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यात भाजपचे १०६, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ आमदारांचा समावेश आहे. राज्यसभेच्या एका जागेसाठी ४२ मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आणि भाजपकडे ११३ आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि ‘राष्ट्रवादी’चा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर, भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. तिसरी जागा भाजपने लढवल्यास त्यांना १३ मतांची गरज भासणार असून, त्यासाठी मतांची फोडाफोडी करावी लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमध्ये महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळत असलेले डॉ. पीयूष गोयल यांची उमेदवारी अपेक्षित होती. मात्र, दुसऱ्या जागेसाठी भाजपने पंकजा मुंडे, विनय सहस्रबुद्धे, हर्षवर्धन पाटील यांची नावे बाजूला ठेवून, डॉ. अनिल बोंडे यांना उमेदवारी दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात डॉ. बोंडे कृषीमंत्री होते. सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. सध्या भाजपच्या किसान आघाडीत सक्रिय असलेल्या डॉ. बोंडे यांना भाजपने राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने रविवारी जाहीर केलेल्या १६ उमेदवारांमध्ये सहा उत्तर प्रदेशातील आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारमधून प्रत्येकी दोन उमेदवार, तर मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड आणि हरियाणामधून प्रत्येकी एका उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे.
कर्नाटकमधून सीतारामन यांच्यासह जग्गेश, तर बिहारमधून सतीशचंद्र दुबे व शंभू शरण पटेल यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशमधून दर्शना सिंह आणि संगीता यादव या दोन महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. हरियाणातील राज्यसभा सदस्य आणि भाजपचे सरचिटणीस दुष्यंत गौतम यांच्याऐवजी पक्षाने या राज्यातून माजी आमदार क्रिशनलाल पनवर यांचे नाव जाहीर केले आहे. याशिवाय, कविता पाटीदार (मध्य प्रदेश), घनश्याम तिवारी (राजस्थान) आणि कल्पना सैनी (उत्तराखंड) यांची उमेदवारी भाजपने जाहीर केली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…