मामाच्या लग्नात वरातीत नाचणाऱ्या भाच्याला घोड्याने लाथ मारल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. तर आनंदात असणारे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
काळ कधी कुणाला, केव्हा घेऊन जाईल याचा नेम नसतो अशीच एक घटना नागपूर जिल्ह्यातील खापा येथे घडली. घरात लग्न असल्याने संपूर्ण कुटुंब आनंदात होते. लग्न मंडपात वरात जात असताना सहा वर्षीय चिमुकल्या भाच्याला घोड्याने लाथ मारली. त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले आहे. हशमेल सलमान शेख असे मृतक बालकाचे नाव आहे.
मृतक हशमेल हा मुळचा शिवा-सावंगा येथील रहिवासी असून आईवडिलांसोबत मामाच्या लग्नाला खापा (Nagpur) येथे आला होता. नवरदेव घोड्यावर बसून होता. बॅन्डच्या तालावर घोडा व वऱ्हाडी मंडळी सुद्धा नाचत होती. दरम्यान वस्तीमधील एकाने ओवाळणी म्हणून दहा रुपयांच्या नोटांची उधळण केली.
या ओवाळणीतील नोटा उचलण्यासाठी हशमेल हा घोड्यामागे गेला. त्याचवेळी घोड्याने लाथ मारल्याने तो जवळच असलेल्या दगडावर फेकल्या गेला. जखमी अवस्थेतील हशमेलला कुटुंबीयांनी खापा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. येथे हशमेलवर प्रथमोपचार केल्यानंतर त्यास सावनेर येथील शासकीय रुग्णालयात आणले. येथे तपासणीअंती हशमेलला मृत घोषीत केले.
हशमेलच्या डोक्याला आतून गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. ठाकरे यांनी दिली. चिमुकल्या हशमेलच्या मृत्यूची माहिती खापा येथे धडकताच आनंदाच्या घटीकेवर दुःखाची छाया पसरली. चिमुकल्याच्या अचानक मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…