पत्नी चुकीच्या महिलेच्या संगतीला लागली आणि वारंवार सांगूनही ऐकत नसल्याने पती ने गळा आवळून पत्नी ची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील गोरेगाव परिसरात घडली आहे.
अन्सार अली असे हत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे. तर रोझी खातून असे मयत पत्नीचे नाव आहे. महिलेच्या बहिणीने याबाबत फिर्यादीला माहिती दिल्यानंतर हत्येचा गुन्हा उघडकीस आला. पत्नीची हत्या केल्यानंतर पती घटनास्थळावरुन उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पळून गेला होता. मात्र दिंडोशी पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत आरोपीचा शोध घेत त्याला प्रयागराज येथून अटक केली. आरोपी विरोधात दिंडोशी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
उशीने गळा आवळून पत्नीची हत्या
आरोपी अन्सार अली आणि रोझी खातून यांचा 9 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोघेही मुंबईतील गोरेगाव परिसरातील संतोष नगर परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. आरोपी वाहन चालक म्हणून काम करतो आणि अनेकदा कामानिमित्त बाहेर असायचा. याच दरम्यान पत्नी चुकीच्या संगतीत लागल्याचे आरोपी म्हणणे आहे. वारंवार समजावूनही पत्नी संगत सोडण्यास तयार नव्हती. रात्री उशिरापर्यंत फोनवर व्यस्त असायची. याचाच राग पतीच्या मनात होता. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे दोघे पती-पत्नी जेवण करुन झोपले. त्यानंतर रात्री गाढ झोपेत असताना आरोपीने उशीने पत्नीचा गळा आवळला. यात पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…