ताज्याघडामोडी

मुलाला मामाच्या घरी न पाठवल्याचा राग, जावयाला टेम्पोखाली चिरडून सासऱ्याने केलं ठार

सासऱ्यानेच आपल्या जावयाच्या अंगावर टेम्पो नेत त्याला चिरडून ठार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुलाला मामाच्या घरी पाठवत नसल्याने नसल्याचा राग आल्याने सासऱ्याने जावयाला ठार केल्याची माहिती समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

कर्जत तालुक्यातील कौडणा आणि मुळेवाडी येथील दत्तात्रय जाणू मुळे हे सूद्रिक यांचे जावई आहेत. सुद्रिक हे वर्ष श्राद्धच्या कार्यक्रमला आले होते. त्यावेळी नातवाला घेण्याचा आग्रह धरला. मात्र मुलाला घेऊन जाण्यास मुळे यांनी विरोध केला. दत्तात्रय मुळे यांनी टेम्पोत बसलेल्या मुलांना उतरवण्यासाठी टेम्पो वर चढले त्यावेळेस त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले.

याच दरम्यान दत्तात्रय मुळे हे खाली पडले. त्यानंतर सुद्रिक यांनी टेम्पो दत्तात्रय यांच्या अंगावर घातला. त्यावेळेस मुळे हे जागीच ठार झाले. या घटनेनंतर दत्तात्रय यांचे वडील जानू मुळे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात रवींद्र बाबासाहेब सूद्रिक, बाबासाहेब दत्तात्रय सुद्रिक, नरेंद्र सदाशिव सूद्रिक, विठ्ठल सदाशिव सुद्रिक, अमोल बाबासाहेब सुद्रिक, सदाशिव दत्तात्रय सुद्रिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सासरे सुद्रिक यांच्यासह एकूण नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago