राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव संभाजीराजे यांच्यापुढे शिवसेनेकडून मांडण्यात आला. मात्र, राज्यसभेसाठी उमेदवारी शिवसेनेकडून न लढवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. संभाजीराजे यांनी राज्यसभेसाठी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे जाहिर केल्यामुळे संभाजीराजे यांना मविआचा पाठिंबा मिळण्याची शक्यता मावळली आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे.
संभाजीराजे यांनी पोस्टमध्ये लिहिले, ‘मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेतलं स्वराज्य घडवायचं आहे. मी त्यांच्या विचारांशी कटबिद्ध असेन. मी फक्त जनतेशी बांधील असेल.’
संभाजीराजे यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी महाविकास आघाडी सरकारने त्यांनी निवडणुकीत पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली होती. राज्यसभेची सहाव्या जागेसाठी शिवसेना उमेदवार निवडणूक लढवणार असल्यामुळे शिवसेनेने संभाजीराजे यांना शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला. मात्र, संभाजराजे निवडणूक अपक्ष लढवणार असल्याच्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे शिवसेनेच्या दृष्टीने संभाजीराजे विषय संपला असल्याचे जाहिर केले. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत संभाजीराजे यांना मविआचा पाठिंबा मिळणे अशक्य आहे.
राज्यसभेसाठी शिवसेनेकडून दोन संजय
राज्यसभेसाठी शिवसेनेतर्फे खासदार संजय राऊत आणि कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याने त्यांच्या उमेदवारीचा विषय मागे पडला असून शिवसेनेकडून दुसऱ्या उमेदवारीसाठी संजय पवार यांची वर्णी झाली आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…