ताज्याघडामोडी

एका लग्नाची दुसरी गोष्ट; वर तोच अन् वधूही तीच, एकाच दिवशी झाला दोनदा विवाह

तोच नवरदेव.. तीच नवरी.. विवाह मात्र दोनदा.. आणि तोही एकाच दिवशी. ऐकून आश्चर्य वाटले ना? मात्र अहमदनगरमधील सागर आणि प्रियांका या नवदाम्पत्याच्या जीवनात हा अनोखा योगायोग जुळून आला.

एकाच दिवशी दोनदा संपन्न झालेल्या या विवाहाची आता सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातल्या राहाता तालुक्यातील जळगाव येथील सागर वैराळ याचा कोपरगाव तालुक्यातील प्रियंका घारू हिच्याशी नुकताच विवाह पार पडला. विवाहाचे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर वधू-वरांसह वर्‍हाडी मंडळी सायंकाळच्या सुमारास जळगाव येथे पोहचले. वराकडून वरातीची जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र त्याचवेळी जळगावात रामकथेचा कार्यक्रम सुरू होता. योगायोगाने त्याच दिवशी रामकथेतील सिता स्वयंवराच्या प्रसंगाचे निरूपण महाराज करत होते. सिता स्वयंवरात पुन्हा या नववधूवरांचा विवाह लावण्याची कल्पना गावकऱ्यांना सूचली.

गावकर्‍यांनी हा प्रस्ताव वरपित्यासमोर मांडला. हा प्रस्ताव ऐकल्यानंतर हर्षउल्हासित झालेल्या वर पित्याने वरात थांबवून तात्काळ गावकर्‍यांच्या प्रस्तावाला होकार दिला आणि वधूवरांसह वैराळ कुटुंब रामकथा सुरू असलेल्या ठिकाणी पोहचले.

रामायणातील पात्राप्रमाणे, वर सागर आणि वधू प्रियंका यांना राम सितेप्रमाणे मुकूट परिधान करण्यात आला. त्यानंतर सुमधूर आवाजात मंगलअष्टके म्हणून हा विवाह पुन्हा एकदा संपन्न केला. हा विवाह पाहण्यासाठी संपूर्ण गाव उपस्थित होते. अशा पध्दतीने एकाच दिवशी दोनदा विवाह करण्याचे भाग्य सागर आणि प्रियंका या वधूवरांना मिळाले. त्यामुळे या विवाह सोहळ्याची आता राज्यभरात चर्चा रंगू लागली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

6 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

6 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago