विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूक निर्णयावर आक्षेप घेतल्याच्या रागातून विरोधी पक्षातील टोळक्याने एकाच्या घरी जात संसार उपयोगी साहित्यांची तोडफोड करत तिघांना मारहाण केली.
ही घटना रविवारी संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास उरळीकांचनजवळ पांढरस्थळ वस्तीवर घडली. अनिकेत राजेंद्र कांचन, वरूणराज संजय कांचन अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अर्जुन रामचंद्र कांचन (वय 46 )यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
अर्जुन हे पांढरस्थळ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूकीला उमेदवार होते. त्यांच्या गटातील तीन लोक विजयी झाले होते. मात्र, अर्जुन यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता. त्याचा राग आल्यामुळे विरोधी गटातील अनिकेत आणि वरूणराज यांच्यासह इतरांनी 22 मे रोजी अर्जुन यांच्या घरी राडा घातला. त्यांच्या घरातील टेबल, सोफा, फ्रीजसह इतर साहित्यांची तोडफोड केली. अर्जुन यांच्या आई, पत्नी आणि मुलीला मारहाण करून शिवीगाळ केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे तपास करीत आहेत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…