औरंगाबाद: पुंडलिक नगर येथे आज सकाळी राहत्या घरात कलंत्री दाम्पत्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता.
धारदार शस्त्राने निर्घृण खून करून मृतदेह पलंगाच्या खाली लपवून आरोपी घराला बाहेरून कुलूप लावून फरार झाला होता. या खुनाचा उलगडा झाला असून मुलानेच केवळ ७०० रुपयांसाठी आई-वडिलांचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी मुलगा आकाश हिरालाल कलंत्री यास शिर्डी येथे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, पुंडलिक नगर येथे शामसुंदर हिरालाल कलंत्री ( ५५) यांचे भांडे विक्रीचे दुकान आहे. शनिवारी मुलगा किरण याने हिशोबात घोळ केल्याचे वडील हिरालाल यांच्या लक्षात आले. त्यांनी हिशोबात कमी असलेले ७०० रुपयांचा जाब मुलगा आकाशला विचारला. यातून बापलेकात वाद झाले. यामुळे संतापलेल्या आकाशाने वडिलांची धारदार शस्त्राने हत्या केली.
यावेळी घरी असलेल्या सावत्र आई किरण (४५ ) यांना देखील आकाशाने संपवले. यानंतर दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या मजल्यावर पलंगाच्या खाली लपवून तो फरार झाला. पोलिसांनी तांत्रिक तपास करत आकाशचे लोकेशन ट्रेस केले. तो शिर्डी येथे असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी लागलीच याची माहिती शिर्डी पोलिसांना दिली. शिर्डी पोलिसांनी कारवाई करत लागलीच आकाशला ताब्यात घेतले आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…