ताज्याघडामोडी

भारतीय रेल्वे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर, गुप्तचर यंत्रणांचा अलर्ट

भारतीय रेल्वे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. आयएसआयनं रेल्वेवर दहशतवादी हल्ल्याचा कट रचला आहे. आयएसआयचा घातपाती कारवायांचा हा कट उघड झाला आहे. यानंतर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

गुप्तहेर यंत्रणांनी या संदर्भात अलर्ट जारी केलाय. पंजाब आणि इतर आसपासच्या राज्यात रेल्वे गाड्या, रेल्वे स्टेशन्स, रेल्वे ट्रॅक यांना दहशतवाद्यांकडून मोठा धोका असल्याचा अलर्ट देण्यात आलाय. आयएसआयने यासाठी स्थानिक हस्तकांना मोठ्या प्रमाणात फंडींग केलंय. भारतातल्या आयएसआयच्या स्लीपर सेल्स अॅक्टिव्ह झाल्या आहेत.

भारतीय रेल्वे याआधी ही दशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिली आहे. 2006 मध्ये मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. 11 जुलै 2006 रोजी मुंबईत संध्याकाळी 6.23 वाजून 11 मिनिटांच्या आत पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांच्या सात बोगींमध्ये सात सीरियल बॉम्बचा स्फोट झाला होता. ज्यामध्ये 189 प्रवासी ठार झाले होते तर 817 जण जखमी झाले होते. माटुंगा रोड, माहीम, वांद्रे, खार रोड, जोगेश्वरी, बोरिवली आणि मीरा रोड स्थानकावर हे सात मालिका बॉम्बस्फोट झाले होते.

गर्दीची ठिकाणं ही नेहमीच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर राहिली आहे. मुंबईवर देखील अनेकदा दहशतवादी हल्ले झाले. मुंबईच्या लोकल या नेहमीच गर्दीचं भरलेल्या असतात. त्यामुळे मुंबईवर देखील नेहमी दहशतवादी हल्ल्याचं सावट असतं.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

4 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago