ताज्याघडामोडी

शिवसेना धक्कातंत्राच्या तयारीत, कोल्हापूरच्या कट्टर शिवसैनिकाचं नाव चर्चेत

शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना दिलेला अल्टीमेटम संपला असून आता शिवसेना नेत्यांनी त्यांची पुढची रणनिती आखायला सुरुवात केली आहे. त्यानुसार पक्षातील कट्टर शिवसैनिक पदाधिकाऱ्यालाच राज्यसभेची उमेदवारी देण्यासंदर्भात निर्णय झाला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिरुरचे माजी खासदार आढळराव पाटील, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर तसंच चौथं आश्चर्यकारक नाव म्हणजे कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक संजय पवार यांची नावे राज्यसभेसाठी चर्चेत आहेत.

आज दुपारी १२ वाजता वर्षावर येऊन शिवबंधन बांधा, आम्ही तुमची उमेदवारी जाहीर करु, अशी ऑफर शिवसेनेने संभाजीराजे छत्रपतींना दिली होती. मात्र सेनेची ऑफर धुडकावून संभाजीराजेंनी सकाळीच मुंबईहून कोल्हापूरकडे प्रयाण केलं. आपण अपक्ष लढण्यावर ठाम आहोत, असे संकेतच त्यांनी आपल्या कृतीतून दिले. संभाजीराजेंच्या ठाम भूमिकेनंतर आता शिवसेनेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. सहाव्या जागेवर शिवेसेनेचाच उमेदवार जिंकून येणार, आम्ही कुणाही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, अशी ठाम भूमिका घेऊन शिवसेनेने एकप्रकारे संभाजीराजेंचा प्रश्न निकाली काढला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात कोणत्या नावांवर खलबतं सुरु आहे, याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केल्यास माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिरुरचे माजी खासदार आढळराव पाटील, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि संजय पवार यांची नावे प्रामुख्याने चर्चेत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी लोकसभेला पराभूत झालेल्या २ सेना नेत्यांची नावे चर्चेत आहेत. चंद्रकांत खैरे, आढळराव पाटील यांचं राजकीय पुनर्वसन शिवसेनेला करायचे आहे. जर संभाजीराजे शिवसेनेत यायला उत्सुक नाहीत तर अशावेळी या दोन नेत्यांचा विचार प्रामुख्याने होऊ शकतो, असं सूत्रांनी सांगितलं. तसेच संजय राऊत यांच्या खांद्याला खांदा लावून दिल्लीत हिंदुत्वाचा आणि शिवसेनेचा आवाज बुलंद करणारी ही दोन नावे आहेत. त्यामुळे ही दोन नावे शिवसेनेच्या टॉप लिस्टमध्ये आहेत, असं सांगितलं जातंय.

उर्मिला मातोंडकर यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसची साथ सोडत सेनेचा भगवा हाती घेतला. त्यानंतर लगोलग सेनेने त्यांची विधान परिषदेवर वर्णी लावायची ठरवली. १२ आमदारांच्या यादीत त्यांचंही नाव समाविष्ट केलं. पण राज्यपाल कोश्यारींनी आणखी कोणताही निर्णय न घेतल्याने १२ आमदारांची फाईल आणखीही तशीच आहे. त्यामुळे मातोंडकर यांच्या नावापुढे आणखी काही आमदारकी लागली नाही. आता राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी त्यांचंही नाव चर्चेत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

1 week ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

1 week ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago