नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने आपली बायको नांदायला येत नाही म्हणून त्याने सासुच्या पोटात कात्री खुपसून तिची हत्या केली.
तर भांडण सोडवणाऱ्या पत्नी आणि मुलीवरही विळ्याने वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही धक्कादायक घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झारवड बुद्रुक याठिकाणी घडली आहे. या घटनेत सासूचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी आणि मुलगी गंभीर झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपविभागीय अधिकारी कविता फडतरे, घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली आहे.
सासूची हत्या, पत्नी आणि लेकीवरही वार
या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात बाळा निवृत्ती भुतांबरे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जांभुळवाडी येथील कळमुस्ते गावातील किसन महादु पारधी याचे लग्न झारवड येथील कमळाबाई सोमा भुंताबरे यांच्या मुलीशी झाले होते. आरोपी किसन महादु पारधी याला दारुचे व्यसन असल्याने त्याची पत्नी इंदुबाई सासरी नांदायला जात नव्हती.
घटनेच्या वेळी सकाळी दहा वाजता किसन पारधी याने पत्नी इंदुबाई नांदायला का येत नाही? अशी कुरापत काढत तिच्यावर विळ्याने हल्ला केला. त्यावेळी सासू कमळाबाई सोमा भुताबरे आणि मुलगी माधुरी या भांडण सोडवण्यासाठी गेल्या असता आरोपीने मुलीच्या हातावरही विळ्याने वार करत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याने सासू कमळाबाई भुतांबरे यांच्या पोटात आणि पाठीत कात्रीने वार केले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
संशोधनातून भारताला विकसित देश बनवा- डॉ. परिक्षित महाल्ले, पुणे एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ…
पंढरपूर - गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षण…
लाईफलाईन हॉस्पिटल येथे कॅन्सरसह विविध गंभीर आजारावर शस्त्रक्रियांची सोय डॉ. शैलेश पुणतांबेकर हे पुण्यातील एक…
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन…
पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा 'माजी विद्यार्थी मेळावा' आणि ‘पदवीप्रदान समारंभ’ स्वेरी कॉलेज कॅम्पस मध्ये येत्या…
पंढरपूर सिंहगडमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन: पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…