अल्पवयीन विद्यार्थीनी 1 मे रोजी सकाळच्या सुमारास घरासमोर कपडे वाळत घातलताना बेपत्ता झाली होती. नातेवाईकांनी शोध घेऊनही ती सापडली नाही. शेवटी तीच्या वडिलांनी २ मे रोजी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगी बेपत्ता झाली असून अज्ञात व्यक्तीने तीचे अपहरण केल्याची तक्रार दाखल केली.
त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता पीडित मुलगी बेपत्ता झाली. त्याच भागातून खाजगी शिकवणी घेणारा कथित शिक्षकही बेपत्ता असल्याचे तपासात समोर आले.
पोलीस उपनिरीक्षक पंकज पाटील यांनी याबाबत शोध मोहीम घेतली तो कथित शिक्षक आपला मोबाईल वारंवार बंद करत होता. मात्र त्याचे मोबाईल लोकेशन फरीदाबाद रेल्वे स्टेशन दाखवित होते. स्थानिक पोलिसांनी फरीदाबाद रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांना या शिक्षका बाबतची माहिती व फोटो पाठवले होते. त्या आधारावर रेल्वे पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले.
शुक्रवारी सायंकाळी कल्याण तालुका पोलिसचे पथक पीडित मुलीच्या वडिलांना सोबत घेऊन फरीदाबादला गेले. रेल्वे स्थानक गाठत त्यांनी शनिवारी पीडित मुलीला वडलांच्या ताब्यात दिले. तसेच कथित शिक्षक ललित चौधरीला पोलिसांनी बेड्या ठोकत अटक केली आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…