इलेक्ट्रिक बाइकची बॅटरी चार्जिंगला लावत असताना शॉक लागून युवतीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये घडली आहे.
कराड तालुक्यातील म्होप्रे येथे शुक्रवार (20 मे) रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
शिवानी अनिल पाटील (वय 23, रा. म्होप्रे, ता. कराड) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, म्होप्रे येथील युवती शिवानी पाटील ही आपल्या इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी चार्जिंगला लावण्यासाठी गेली असता तिला अचानकपणे शॉक लागला.
ही बाब लक्षात येताच नातेवाईकांनी तिला त्वरीत उपचारासाठी कराडला रुग्णालयात हलवले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. हा शॉक नेमका कसा लागला याचा देखील आता पोलीस तपास करणार आहेत. या प्रकरणाची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल खाडे करत आहेत.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…