430 किलो भेसळयुक्त चहा पावडर जप्त
मुंबई पोलिसांनी चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून 430 किलो भेसळयुक्त चहा पावडर मुंबईतील शिवडी बंदर रस्त्यावर पोलिसांनी छापेमारी जप्त केली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून दोन आरोपींना आज अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून त्याची पोलिस कोठडी मागण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत दुधात भेसळ, पनीरमध्ये भसेळ, खव्यात भेसळ अशा बातम्या ऐकल्या आहेत. पण आता चक्क चहा पावडरमध्येही भेसळ होत असल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलिसांनी चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या रॅकेट उद्ध्वस्थ केल्यामुळे खळबळ माजली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबईतील शिवडी बंदर रोडवर छापेमारी केली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती नुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भेसळयुक्त चहा पावडर पकडली आहे. पोलिसांनी या कारवाईत 430 किलोची भेसळयुक्त चहा पावडर शिवडीच्या बंदररोड परिसरातून जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात खळबळ पसरली आहे. सध्या बाजारात या भेसळयुक्त चहा पावडरची किंमत 85 हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी पोलिसांनी राजू अबुलजहर शेख, राहुल शेख या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी या दोघांना अटक केली असून या प्रकरणासंदर्भातील अधिकचा तपास पोलिस करत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…