Categories: Uncategorized

बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत मागितली 10 लाखांची खंडणी

दोघांना अटक

 

अंधेरीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये एका व्यावसायिकाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहारा पोलीस स्टेशन कडून करण्यात येत आहे. व्यावसायिकाच्या तक्रारीवरून सहार पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 कांदिवली परिसरात राहणारे व्यापारी सहार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पंचतारांकित हाॅटेलमध्ये थांबले होते. यावेळी इरफान रमजान शेख व महिला जेवण करण्याच्या बहाण्याने पंचतारांकित हाॅटेलमध्ये शिरले. काही वेळांनी इरफान हा फरार महिला व व्यावसायिकाला एकट सोडून खोलीबाहेर पडला.यानंतर महिलेने एकट्या व्यावसायिकासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात इतर आरोपी खोलीत आले. महिलेच्या मदतीने आरोपींनी व्यावसायिकाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. तसेच पोलिस ठाण्यात गुन्ह दाखल न करण्यासाठी व्यावसायिकाला 10 लाखांची खंडणी मागितली.
 मात्र व्यावसायिकाने आरोपींना खंडणी देण्यास नकार दिला. यानंतर आरोपींनी व्यावसायिकाला शिवीगाळ करीत मारहाण केली. यामुळे घाबरलेल्या व्यावसायिकाने सहार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी इरफान रमजान शेख, पराग अरुण भुई या दोघांना अटक केली आहे. तसेच फरार महिलेसह दोन जणांचा शोध घेण्यात येत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago