नवरा वयाने दुप्पट आणि पुढे शिकवणार की नाही या भितीने एका आईने15 वर्षाच्या मुलाला फुटपाथवर सोडून दिल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे.
मुंबई पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करून या बाळाच्या आईचा शोध लावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणेच्या हद्दीत चौपाटीवर बस स्टॉपच्या आडोशाला एक अज्ञात व्यक्ती साधारण १५ दिवसांच्या नवजात बाळाला ठेवून गेल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या मरीन ड्राईव्ह पोलिसांना मिळाली होती. तात्काळ महिला पोलीस उपनिरीक्षक मनिषा ढेकळे यांनी पोलीस पथकासह जाऊन त्या नवजात बाळाला कुशीत घेतलं आणि पोलीस स्टेशनमध्ये आणले. यानंतर बाळाला औषधोपचार करून, बाल कल्याण समितीचे आदेश घेवून आशा सदन येथे जमा केले.
अवघ्या १५ दिवसांच्या मुलाला आई सोडून गेली आणि बाळ तसच उघड्यावर होतं. पोलिसांनी वेळात त्या बाळाचा सांभाळ करायला सुरुवात केली पण ती निर्दयी आई कोण होती, जिने इतक्या लहान बाळाला अज्ञातस्थळी सोडून दिले. याचा शोध पोलिसांचा घ्यायचा होता. सपोनि भंडारे पो.उप.नि. कदम आणि गुन्हे प्रकटीकरण पथक यांच्यावर बाळाची आई शोधण्याचे काम सोपवले गेले.
त्यानुसार त्यांनी चर्चगेट रेल्वे स्टेशन तसंच त्यानंतर मरीन लाईन्स,चर्नी रोड, ग्रँड रोड,मुंबई सेंट्रल,महालक्ष्मी प्रभादेवी,लोवर परेल, दादर, दादर सेंट्रल,माटुंगा,सायन, कुर्ला,विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी ,कांजूरमार्ग, भांडुप ,नाहूर, मुलुंड ,ठाणे, कळवा ,दिवा ,मुंब्रा ,डोंबिवली, ठाकुर्ली ,कल्याण ,शहाड, अंबिवली,टिटवाळा, खडवली या रेल्वे स्टेशनचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि त्यांना एक मुलगी हातात बाळ घेवून जाताना दिसली हे सीसीटीव्ही फुटेज होते चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील आणि हाच धागा पकडत मरीन ड्राईव्ह पोलीस त्या बाळाच्या आई पर्यंत पोहोचली. तपासा दरम्यान सदर बाळाला ठेवणारी त्याची आई आणि तिच्यासोबत एक पुरुष सीसीटीव्हीत दिसत होता. हे दोघे चर्चगेट रेल्वे स्थानकावरुन येवून मरीन लाईन्स येथे जाताना दिसले. नंतर पुन्हा चर्चगेट स्टेशनला येवून दोघे दादर येथे उतरुन मध्य रेल्वच्या दिशेने गेले आणि तिथून ट्रेनमध्ये बसले आणि खडवली रेल्वे स्थानकावर उतरताना दिसले.
पण पुढे ते दोघे कुठे गेले याचा पत्ता पोलिसांना लागत नव्हता. त्यामुळे आता वाळवंटातून सुई शोधण्यासारखे त्या बाळाच्या आईला पोलीस शोधत होते. बघता बघता त्यांना बाळाची आई आणि मामा यांचा शोथ लागला आणि पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली. (जायचे होते शिर्डीला पोहोचले मुंबईला, स्पाईस जेट विमानाचे मुंबई विमानतळावर लँडिंग) बाळाची आई सरोज सत्यनारायण सहारण (वय 22 वर्ष) व मामाचे नाव राम सेवक यादव (वय 28 वर्ष) असल्याचे त्यांनी सांगितले.
पण धक्कादायक म्हणजे, मुलगी बिहार राज्यातील तिचा नवरा राजस्थान राज्यातील आणि त्यांनी लग्न केले मुंबईत. पण नवऱ्याचे वय आपल्या पेक्षा दुप्पट आहे तसंच तो पुढे आपल्याला शिकवेल की नाही या भितीने नुकतंच या जगात पाऊल ठेवलेल्या १५ वर्षाच्या बाळाला सरोज हिने फुटपाथवर बेवारसपणे ठेवून निघून गेली होती. पोलिसांनी सरोज आणि राम सेवक यांना अटक केली आहे. तर आता सरोत आपल्या बाळाचे संगोपन करणार की नाही या संबंधी कायदेशीर कारवाईकरुनच बाळाला त्याच्या आईकडे दिले जाईल असं पोलिसांनी स्पष्ट केलंय. पण आई वडिलांच्या भांडणापायी आई-वडील जिवंत असून पण अनाथा सारखे रहावं लागत आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…