ताज्याघडामोडी

लग्नात मिळालेल्या ‘टेडी बिअर’मध्ये स्फोट; तरुणाची प्रकृती चिंताजनक

लग्नात नवदाम्पत्याला पुरस्काराच्या स्वरूपात ‘टेडी बिअर मिळाले. पुरस्कार उघडत असता स्फोट झाला आणि नवविवाहित तरुणासह पुतण्या गंभीर जखमी झाला. दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नवविवाहित तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील वांसडा तालुक्यातील मिठंबरी येथे घडली. लतेश गावीत असे गंभीर जखमी नवविवाहिताचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, लतेश गावीत आणि सलमा यांचा १२ मे रोजी विवाह झाला. लग्नात पाहुण्यांनी वधू-वरांना भेटवस्तू दिल्या. लतेशने फराळ करताना भेटवस्तू पाहण्यास सुरुवात केली. दरम्यान, भेट म्हणून आलेल्या टेडी बिअरमध्ये स्फोट झाला. या स्फोटात लतेशचा डोळा पूर्णपणे निकामी झाला. तर डाव्या हाताचे मनगट तुटले. तसेच शरीराचा वरचा भागही भाजला आहे. सोबतच तीन वर्षांचा पुतण्या गंभीर जखमी झाला.

जखमींना उपचारासाठी नवसारी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोबतच पुतण्या जियास पंकज याच्यावरही वांसदा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. सलमाच्या मोठ्या बहिणीचा माजी प्रियकर राजू धसनुख पटेल याने आशा वर्करला टेडी बिअरसारखे इलेक्ट्रॉनिक्स गिफ्ट पाठवले. लतेश लग्नात मिळालेल्या भेटवस्तू पाहत असतानाच मोठा स्फोट झाला, असे लतेशच्या सासरच्यांनी सांगितले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago