ताज्याघडामोडी

विवाहानंतर महिनाभरात नववधू सोने-चांदीचे दागिने आणि पैसे घेऊन पसार

लग्न करताना सावधान राहा. कारण लग्न झाल्यानंतर तुमची मोठी फसवणूक होवू शकते. होय, हे खरं आहे! सद्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात काही ठिकाणी लग्नाळू व्यक्तीची फसवणूक करण्याच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. विवाहानंतर महिनाभरात नववधू सोने-चांदीचे दागिने आणि पैसे घेऊन पलायन केलेच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अशीच घटना गुन्हा वस्त्रोद्योग नगरी इचलकरंजीमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  

मध्यस्तीमार्फत विवाह ठरला आणि लग्नही झाले. त्यानंतर महिनाभरात नवविवाहिताअंगावरील सोन्याचे दागिने आणि रोकड घेऊन पसार झाल्याची घटना इचलकरंजी शहरात घडली आहे. या प्रकरणी विनोद अशोक उत्तुरे (राहणार कबनुर ) यांनी शिवाजीनगर पालिसात फिर्याद दिली आहे.

इचलकरंजी शहर परिसरात राहणाऱ्या सीमा जगदीश मोदानी (रा. कबनुर ), माधुरी शशिकांत चव्हाण ( रा.कबनुर ) शहीदा सरदार बागवान ( रा.रुई ) फारुख सरदार बागवान ( रा. रुई ), रेखा घाटगे ( रा.जयसिंगुर ) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. यातील सीमा, माधुरी, शहीदा आणि फारुख हे चौघे वधुवर सूचकाचे काम करतात. त्यामुळे विनोद उत्तुरे हे लग्नासाठी मुली बघत असल्याची माहिती यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी विनोद उत्तुरे यांना रेखा घाटगे हीचे स्थळ सुचविले. त्यानंतर विवाहाची बोलणी झाल्यानंतर रेखा हिचा विवाह विनोद उत्तुरे याच्या बरोबर लावून दिला.

त्यानंतर लग्नाची फी म्हणून 50 हजार रुपये घेतले. या लग्नात रेखा हिला सोन्याचे दागिने आणि पूजेच्या दिवशी तीन तोळ्याचे घंठन दिलं. यानंतर रेखा घाटगे ही एक महिना विनोद उत्तुरे याच्या बरोबर संसारही थाटला. त्यांनतर मात्र मी माहेरी जाते अशी बतावणी करुन घरातून निघून गेली. यानंतर विनोद उत्तुरे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याप्रकरणी इचलकरंजीमधील शिवाजीनगर पोलिसात गुन्हा नोंद केलाय. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करुन आरोपीचा शोध सुरु केलाय.

अशी घटना फक्त इचलकरंजी शहरातील विनोद अशोक उत्तुरे यांच्याबरोबर घडली आहे असं नाही. तर महाराष्ट्तल्या अनेक भागात त्याचबरोबर सीमा भागात घाईगडबडीत लग्न उरकण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांच्या बाबतीत घडली आहे. त्यामुळे लग्न करणाऱ्यानो सावधान.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

4 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

4 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago