डोंबिवली – येथील पुर्वेकडील खंबाळपाडा परिसरातील केडीएमसीच्या बीएसयूपी प्रकल्पाच्या इमारतीत वायर चोरण्यासाठी आलेल्या दोघा चोरटयांपैकी एक चोरटयाचा पळताना आठव्या मजल्यावरून खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली.
मोहम्मद सलिम भाटकर (वय 24) असे मृत चोरटयाचे नाव असून तो चोरीच्या गुन्हयात सराईत होता. त्याचा सहकारी अरफान पिंजारी हा जखमी झाला असून त्याच्यावर मनपाच्या शास्त्रीनगर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद टिळकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
केडीएमसीच्या वतीने बीएसयुपी योजनेंतर्गत शहरी गरिबांसाठी घरकुले उभारण्यात आली आहेत. परंतू बहुतांश ठिकाणी घरकुलांचा ताबा लाभार्थ्यांना न मिळाल्याने खंबाळपाडा, इंदिरानगर भागातील इमारती सध्या भग्नावस्थेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या इमारतींना चोरटयांनी लक्ष केले आहे.
दरवाजे, ग्रील, लिफ्टचे सामान चोरीला गेल्याच्या घटना आधी घडल्या आहेत. दरम्यान खंबाळपाडा इमारतीमधील बिल्डिंग नंबर चारच्या आठव्या मजल्यावर इलेक्ट्रिक वायर चोरी करण्यासाठी अरफान आणि मोहम्मद हे दोघे चोरटे सोमवारी मध्यरात्री आले होते. इमारतीमध्ये चोर शिरल्याचे वॉचमनच्या लक्षात येताच तो त्यांच्या पाठिमागे गेला.
वॉचमनमुळे आपण पकडले जावू या भितीने दोघांनी इमारतीच्या ड्रेनेज पाईपलाईनवरून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. यात हात निसटल्याने मोहम्मद आणि अरफान आठव्या मजल्यावरून खाली कोसळले. यात मोहम्मदच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अरफान गंभीर जखमी झाला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…